अमळनेर :- येथील नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत असून, सर्व प्रभागांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद व दिग्गज नेत्यांचे भक्कम पाठबळ लाभल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भूमिपुत्र आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आणि माजी आमदार साहेबराव पाटील ही त्रिमूर्ती ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. या तिन्ही नेत्यांचा संयुक्त प्रभाव, अनुभव आणि स्थानिक पातळीवरील पकड यामुळे अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचे उमेदवार एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभांमध्ये आणि प्रभागभेटीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत असून, या तिघा नेत्यांचा करिष्मा मतदारांवर प्रभाव टाकताना दिसत आहे.
प्रचारसभांना होतेय प्रचंड गर्दी
प्रत्येक प्रभागात घेतल्या जाणाऱ्या भेटी, सभांमध्ये जनतेचा उत्साह लक्षणीय वाढताना दिसत आहे. घराघरांतून जितेंद्र ठाकूर व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना तरुणाई, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रचारदरम्यान नागरिकांकडून शहरातील विकासकामांबाबत अनेक सूचनाही देण्यात येत असून, जितेंद्र ठाकूर त्या सूचना ऐकून त्यांची दखल घेत आहेत. या संवादशील भूमिकेमुळे त्यांच्याविषयी विकासाभिमुख आणि सहज उपलब्ध नेता अशी प्रतिमा अधिक बळकट होत आहे. सर्वांगीण प्रतिसाद, सशक्त नेतृत्वाचे पाठबळ यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र ठाकूर यांची दावेदारी दिवसेंदिवस आणखी भक्कम होत आहे.
खान्देश समाचार….
