अमळनेर (प्रतिनिधी):
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमळनेर येथील चोपडा रोडवरील प्राचीन श्री वर्णेश्वर महादेव मंदिरात यंदा महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
१३ फेब्रुवारी २०२६: सायंकाळी ७ वाजता ‘मेहंदी रस्म’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारी २०२६: दुपारी ४ वाजता बाबा वर्णेश्वर यांची भव्य ‘शाही सवारी’ निघणार आहे. वर्षातून एकदा बाबा आपल्या प्रजेला आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी नगरभ्रमंती करतात, अशी या शाही सवारीची प्राचीन मान्यता आहे.
१४ फेब्रुवारी २०२६: रात्री ९ वाजता ‘हळदीची रस्म’ आणि महाआरती संपन्न होईल.
१५ फेब्रुवारी २०२६: सकाळी ७ वाजता महाआरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पुन्हा महाआरती होईल.
हनुमान भक्तीचा जागर: १५ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता मंदिरातील प्राचीन व अति जागृत हनुमंताची आरती, हनुमान चालीसा पठाण, मारुती नमस्कार आणि मारुती स्तोत्र म्हटले जाईल. यानंतर दणदणीत भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
‘चला पुरातन अशा वर्णेश्वर महादेव दर्शनाला, महत्व आहे महाशिवरात्रीच्या सणाला’ या भावनेने संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खान्देश समाचार…
