अमळनेर(प्रतिनिधी )नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांच्या उमेदवारीने जोरदार उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध असलेले आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे तसेच शेकडो तरुणांना रोजगार मिळवून देणारे ज्ञानेश्वर धनगर ऊर्फ नाना धनगर यांचे सुपुत्र सुयोग धनगर यांनी नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
स्थानिक व युवा नेतृत्वाची गरज पूर्ण
प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या निवडणुकीत त्यांना एक स्थानिक आणि तळागाळातील नेतृत्व मिळणार आहे. सुयोग्य धनगर हे अत्यंत मनमिळावू असून, सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन चालणारे आहेत. त्यांनी अनेक गरजू तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे, ज्यामुळे त्यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर खरे समाजसेवक म्हणूनही आहे.
स्थानिक नेतृत्व असल्याने सुयोग धनगर यांना संपूर्ण प्रभागात जोरदार जनसमर्थन मिळत आहे. प्रभागातील अनेक मुलभूत प्रश्न (उदा. पाणी, रस्ते, स्वच्छता) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रभाग १२ च्या सुज्ञ नागरिकांकडून या समस्या सोडवण्यासाठी एका युवा आणि स्थानिक नगरसेवकाची नितांत गरज असल्याचे बोलले जात आहे.
सुयोग धनगर यांना स्वर्गीय जीभाऊ आणि स्वर्गीय रघुनाथ आप्पा यांच्या सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण विभागात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. मोठे मित्रमंडळी आणि प्रभागातील घरा-घरात असलेले सलोख्याचे संबंध यामुळे त्यांना मोठा जनधार मिळत आहे. नागरी सुविधांसाठी योग्य आणि कार्यक्षम स्थानिक उमेदवार म्हणून सुयोग धनगर यांच्याकडे नागरिक मोठ्या आशेने पाहत आहेत.
चर्चेनुसार, सुयोग धनगर हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. अमळनेर नगरपरिषदेच्या राजकारणात प्रभाग १२ चा निकाल यंदा लक्षवेधी ठरणार आहे.
खान्देश समाचार…
