अमळनेर: अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीने सध्या वेग पकडला असून, प्रभाग क्र. २ (अ) ची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे. याचे कारण म्हणजे, कोणत्याही पक्षाचा आधार न घेता, आप्पासो अरुण ओंकार संदानशिव या स्थानिक स्वतंत्र अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यांना मिळालेले ‘बॅट’ हे चिन्ह प्रभागवासीयांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
प्रचारादरम्यान अरुण संदानशिव यांनी अत्यंत स्पष्ट आणि लोकाभिमुख भूमिका घेतली आहे. “माझा कोणताही राजकीय पक्ष नाही, मी फक्त स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहे,” असा थेट संदेश त्यांनी मतदारांना दिला आहे.
प्रचाराचे केंद्रस्थान म्हणून त्यांनी प्रभागातील मूलभूत आणि दीर्घकाळ प्रलंबित समस्यांवर बोट ठेवले आहे, ज्यात खासगी जागा झालेली रस्त्यांची दुर्दशा, पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या, तुंबलेल्या गटारी आणि आरोग्य सुविधांची दुरवस्था यांचा समावेश आहे.
‘आयात’ उमेदवारांविरुद्ध ‘भूमिपुत्र’: गावकऱ्यांचा अभूतपूर्व पाठिंबा
स्थानिक उमेदवार असल्याने आप्पासो संदानशिव यांना मिळत असलेला पाठिंबा अभूतपूर्व आहे. “आमचे प्रश्न स्थानिक गावकरीच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो; बाहेरून आलेले उमेदवार (आयात) हे तात्पुरते असतात,” अशी भावना मतदारांमध्ये प्रबळ आहे.
याच भूमिकेतून, पारंपरिक पक्षांना बाजूला सारून स्वाभिमानी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने आप्पासो अरुण संदानशिव यांच्या पाठीमागे एकजूट दाखवली आहे. ‘बॅट’ या चिन्हाच्या माध्यमातून प्रभाग २ (अ) मध्ये बदलाची नवी लाट येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
खान्देश समाचार..
