भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त, अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” (एकात्मतेसाठी चालणे) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या निमित्ताने, अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, सर्व शासकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय, शाळा यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व तरुण मित्र परिवार यांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२५ (राष्ट्रीय एकता दिवस)
वेळ: सकाळी ७.०० वाजता
ठिकाण: महाराणा प्रताप चौक, अमळनेर
सामाजिक एकात्मता, बंधुता, सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या या वॉक फॉर युनिटी’ मध्ये अमळनेर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
खान्देश समाचार..
