पत्रकार प्रविण बैसाणे
अमळनेर:(प्रतिनिधी)आगामी अमळनेर नगरपालिका आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या अमळनेर तालुक्यातील गट व गणांच्या निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकांसाठी आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
उमेदवारीसाठी संपर्क साधण्याची प्रक्रिया:
अमळनेर नगरपालिका तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गण मधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी थेट तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
भेटण्याची तारीख आणि वेळ: दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता.
स्थळ: संतोष बाबुराव पाटील यांचे कोर्टाजवळ, श्रीकृष्ण कॉलनी येथील निवासस्थान, अमळनेर.
जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील आणि तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील.
संपर्क क्रमांक: ८९९९८५९०२
प्रामाणिक आणि कार्यक्षम उमेदवारांना प्राधान्य:
पक्षाने स्पष्ट केले आहे की, उमेदवारी देताना होतकरू, प्रामाणिक आणि कार्यक्षम उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. जनतेची सेवा करण्याची तळमळ असलेल्या नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे, असे तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या या भूमिकेमुळे अमळनेरच्या स्थानिक राजकारणात चांगलीच रंगत येणार आहे.
खान्देश समाचार..
