अमळनेर: अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ५ मध्ये सध्या एकच चर्चा आहे,ती म्हणजे, श्रीमती मुमताज बी रियाजुद्दीन शेख यांच्या उमेदवारीची आणि त्यांना मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची! मागील अनेक वर्षांपासून निस्वार्थ समाजकार्य करणारे, ‘सेवाव्रती’ रियाजुद्दीन मौलाना यांच्या पत्नी म्हणून, मुमताज बी यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आम्ही आतापर्यंत फक्त आश्वासने पाहिली. पण,रियाज मौलाना आणि त्यांच्या पत्नीने ‘करून’ दाखवले आहे. त्यांना निवडून देणं म्हणजे आमच्या प्रभागाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे.’ प्रभाग ५ मधील एक उत्साही मतदार
सामाजिक कार्याचे बळ, विजयाची खात्री
मुमताज बी यांना मिळत असलेला हा प्रचंड प्रतिसाद केवळ एका राजकीय उमेदवारीमुळे नाही, तर त्यांच्या आणि रियाजुद्दीन मौलानांच्या भक्कम सामाजिक कार्यामुळे आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे, प्रत्येक समाजात त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
शिक्षण आणि रोजगार: आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ३००० हून अधिक कौटुंबिकवाद इतर कारणांमुळे संकटात सापडलेल्या अनेक मुलींना वादाची निवारण करून संसाराला लावून दिले, तसेच अनेकांचे लग्न लावून दिले. लायब्ररी सुरू करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, तसेच योग्य वक्ते बोलवून MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना तयार करणे यामुळे तरुण वर्ग त्यांच्यासोबत जोडला गेला आहे.
संकटमोचक: कोरोनासारख्या भयंकर संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकार्यांसोबत घराघरापर्यंत किराणा मदत किट पोहोचवणारे, तसेच गरजू लोकांसाठी ५० हून अधिक नेत्र शिबिरे आयोजित करून अनेक महिलांचे यशस्वीरित्या ऑपरेशन झाले आहे, योग्य नेतृत्व प्रभागाला प्रथमच मिळत आहे.
राष्ट्रीय एकात्मता: ‘आपण सर्व एक आहोत’आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना रुजवण्यासाठी त्यांनी पोलीस विभागाच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना सर्वपक्षीय नागरिकांची साथ घेऊन अनेक कार्यक्रम राबवत असतात. तसेच कुठलाही सामाजिक विषय असो त्यासाठी पुढाकार घेऊन सोडविण्याच्या प्रयत्न करत असतात.
बदलाची लाट स्पष्ट
प्रभाग क्रमांक ५ मध्ये दूषित पाणी, गटार समस्या अशा अनेक अडचणी वर्षानुवर्षे तशाच आहेत. या समस्या सोडवण्यासाठी रियाजुद्दीन मौलाना यांनी नगर परिषदेकडे वारंवार केलेले नियोजन आणि पाठपुरावा, यामुळे त्याच योग्य उमेदवार असल्याची भावना मतदारांमध्ये प्रबळ झाली आहे.
या निवडणुकीत ‘भावनिक’ आणि ‘वास्तविक’ अशा दोन्ही स्तरांवर मुमताज बी आघाडीवर आहेत. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आलेले उमेदवार नव्हे, तर प्रत्येक सुख-दुःखात सोबत असणारी व्यक्ती म्हणून त्यांना पाहिले जात आहे. सामाजिक कार्याचा हा भक्कम आधार पाहता, प्रभाग क्रमांक ५ मध्ये श्रीमती मुमताज बी रियाजुद्दीन शेख यांचा विक्रमी विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
खान्देश समाचार अमळनेर
