मुख्य संपादक प्रविण बैसाणे
अमळनेर:(प्रतिनिधी)कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या, अमळनेर शाखेचा फलक अनावरण कार्यक्रम नुकताच नगरपरिषद कार्यालयात पार पडला. यावेळी संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमळनेर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल बेंडवाल यांची संघटनेच्या नाशिक विभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्यावर आता नाशिक विभागातील कामगारांच्या समस्या सोडवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
या कार्यक्रमासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. नागेशजी कंडारे आणि राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
अमळनेर शाखेची नवीन कार्यकारिणी:
सचिव: किशोर संगेले
उपाध्यक्ष: यश लोहेरे आणि रमेश कलोसे
कोषाध्यक्ष: शिवचरण संगेले
कार्याध्यक्ष: नरेश घोगले
प्रसिद्ध प्रमुख: सुरेश चव्हाण
संघटक: अक्षय बेडवाल
इतर पदाधिकारी: अनिल बाविस्कर (सहसचिव), राम कलोसे (संपर्क प्रमुख), सागर पवार (सहकोषाध्यक्ष)
सदर कार्यक्रमास इतर संघटनांचे पद अधिकारी मा.सोमचंद संदानशिव, प्रसाद शर्मा, अविनाश संदाशिव अमळनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक मा. संतोष जाधव, मा. किरण कंडारे, मा. संतोष माणिक तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना कामगारांच्या न्याय हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे लढेल, असा विश्वास यावेळी राज्य अध्यक्ष नागेशजी कंडारे यांनी व्यक्त केला.
खान्देश समाचार….
