अमळनेर( प्रतिनिधी)तालुक्यातील
कळमसरे येथून जवळच असलेल्या पाडळसरे येथे (आज दि,3फेब्रुवारी रोजी) सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे.
पाडळसरे येथिल मरिआईची यात्त्रेस अनेक वर्षांची परंपरा आहे.येथील माजी उपसरपंच भिला साळुंखे ये गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात केली आहे.काही वर्षांपासून पाडळसरे या गावाचे नवीन पुनर्वसन समायोजन झाले आहे.तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर व गावात असलेलं मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी संपन्न होत असते,हे विशेष.गावातील इडा पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या या,यात्रोत्सवात गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात.गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी शांताराम चव्हाण दहिवदकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान मंगळवारी होणाऱ्या यात्रोत्सव काळात हॉटेल्स,झुले पाळणे,खेळणी दुकाने,संसारोपयोगी साहित्य दुकानदार यांनी आपली दुकाने थाटावी तसेच यात्रा काळात शांतता राखावी असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.
खान्देश समाचार….
