अमळनेर: नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (ब) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि युवक जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांच्या मातोश्री विद्या संजय भदाणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला वेगळे स्वरूप आले आहे. ‘शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून त्या निवडणूक लढवत असून, त्यांचे नेतृत्व आणि भदाणे कुटुंबाचे प्रभागातील योगदान यामुळे त्यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे हे ‘सत्ता असो वा नसो, सर्वांना न्याय मिळवून देणारे’ नेतृत्व म्हणून परिचित आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम अग्रभागी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देत आले आहेत. प्रभागात युवकांच्या प्रत्येक समस्यांसाठी भूषण भदाणे यांचे सातत्याने पुढे असणे, हा त्यांच्या आई विद्या भदाणे यांच्या प्रचारातील सर्वात मोठा जमेचा मुद्दा ठरत आहे.
या उमेदवारीला विद्यमान आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रभागाच्या समस्या आता नक्कीच सुटणार आहेत, अशी शाश्वती नागरिकांना आहे. युवाशक्ती आणि अनुभवी नेतृत्वाचा हा समन्वय प्रभागाच्या विकासासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
भदाणे परिवाराने आतापर्यंत प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या सुख-दुःखात सक्रिय सहभाग घेऊन केवळ राजकीय नव्हे, तर कौटुंबिक संबंध निर्माण केले आहेत. नागरिकांना या कुटुंबाची ‘शाश्वती’ आहे. याचमुळे, केवळ आश्वासनांवर नव्हे, तर विश्वास आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आधारावर भदाणे परिवाराला प्रभाग १६ (ब) मध्ये मोठ्या प्रमाणात जन-समर्थन मिळत आहे.
एकूणच, प्रभाग १६ (ब) मध्ये भूषण भदाणे यांच्या युवा संघटन कौशल्याच्या आणि अनिल पाटील यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली, विद्या संजय भदाणे यांच्या रूपाने ‘शहर विकास आघाडी’ने एक मजबूत उमेदवार दिला असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विजयाची शक्यता प्रबळ दिसत आहे.
खान्देश समाचार…
