अमळनेर: अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. या अटीतटीच्या लढाईत एक महिला उमेदवार आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि उच्च शिक्षणाच्या बळावर पुरुष उमेदवारांनाही मागे टाकत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह मिळालेल्या बबिताई ताजणे यांनी आपली प्रचारयंत्रणा मजबूत केली आहे.
प्रभाग ३ ‘ब’ च्या उमेदवार बबिताई ताजणे यांची ओळख केवळ एक उच्चशिक्षित महिला म्हणूनच नाही, तर त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा दमदार आवाका यामुळे त्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बॅट हे चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या बबिताई, क्रिकेटच्या बॅटने जसा चेंडू सीमारेषेबाहेर मारला जातो, त्याच धर्तीवर विजयाचा षटकार मारण्याच्या इराद्याने प्रचार करत आहेत. पुरुष उमेदवारांशी स्पर्धा करताना त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
बबिताई ताजणे यांच्या प्रचाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळत असलेला महिला मतदारांचा प्रचंड पाठिंबा. “एक महिलाच दुसऱ्या महिलेला समजू शकते,” या विचाराने मोठ्या संख्येने महिला त्यांच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन महिला मतदारांशी संवाद साधण्यात बबिताईंना यश आले असून, यामुळे त्यांच्या बाजूने महिला मतदारांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. महिलांच्या या अभूतपूर्व समर्थनामुळे बबिताईंची ‘बॅट’ अधिक ताकदीने चालताना दिसत आहे.
दोन पुरुष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत. मात्र, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच बबिताई ताजणे यांनी या दोन्ही पुरुष उमेदवारांना मागे टाकत मतदारांच्या पहिल्या पसंतीची उमेदवार म्हणून आपली जागा निश्चित केली आहे. घरोघरी संपर्क, प्रभावी भाषणे आणि महिलांचा सक्रिय सहभाग यामुळे प्रचारात त्यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. ‘बॅट’ या चिन्हामुळे त्यांची ओळख अगदी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
सध्या तरी प्रचाराच्या आघाडीवर बबिताई ताजणे (बॅट) यांनी घेतलेली ही मुसंडी, प्रभाग ३ ‘ब’ चा निकाल त्यांच्या बाजूने झुकवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खान्देश समाचार…
