अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांसह विविध समाज घटकांचा आघाडीला मिळणारा पाठिंबा कायम असतानाच, आता तीन अपक्ष उमेदवारांनी लेखी पत्र देत या आघाडीला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे आघाडीच्या विजयाची वाटचाल एकतर्फी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या तीन अपक्ष उमेदवारांमध्ये दोन उमेदवारांनी विकास आणि आमदार पाटील यांच्या विनंतीला मान दिला आहे.
प्रभाग क्रमांक १५ ब: महिला राखीव पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या रंजना संजय पाटील (पत्नी – संजय उत्तम पाटील) यांनी आघाडीला पाठिंबा दिला.
प्रभाग क्रमांक १५ अ: सर्वसाधारण पुरुष जागेसाठी अपक्ष अर्ज भरलेल्या भूषण विनेश निकम (पाटील) यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.
या दोन्ही उमेदवारांनी प्रभाग १५ मधील आघाडीचे उमेदवार जयश्री अनिल पाटील, विनोद मधुकर कदम, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि इतर सर्व आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
तिसऱ्या अपक्ष उमेदवाराने केवळ पाठिंबाच दिला नाही, तर थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आघाडीची ताकद वाढवली आहे.
प्रभाग क्रमांक चार: येथील अपक्ष उमेदवार इकबाल शेख यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार इमरान खाटिक यांना पाठिंबा जाहीर केला.
पक्षप्रवेश: पाठिंबा दिल्यानंतर इकबाल शेख यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी इमरान खाटिक, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, शहराध्यक्ष कलीम शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी समोर ठेवलेल्या ,’विकासाच्या व्हिजन’ला मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता विविध समाजघटकांसह अपक्ष उमेदवारही जाहीर पाठिंबा देत असल्याने आघाडीची ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीची वाटचाल आता ‘एकतर्फी विजयाकडे’ सुरू झाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी हे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
खान्देश समाचार…
