अमळनेर (प्रतिनिधी )भारतीय संविधान दिनानिमित्त आदिवासी क्रांती दल शाखा, अमळनेर यांच्या वतीने संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानाच्या गुणगौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विविध समाजातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संविधानामुळे देशातील सर्व नागरिकांना समान हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. या अधिकारांच्या बळावर आज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. हा आदिवासी समाजावरचा डॉ. बाबासाहेबांचा महान उपकार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या ऋणाची परतफेड करणे शक्य नसले तरी 26 नोव्हेंबर संविधान दिन हा दिवस विशेष उत्साहात आणि अभिमानाने साजरा करणे हेच त्यांचे स्मरण असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यक्रमास तालुका अध्यक्ष आप्पा दाभाडे, डॉ. अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बैसाणे, विनोद मोरे, सुनील पवार, दयाराम मोरे, अंजनाबाई चव्हाण, सौ. ज्योतिबाई दाभाडे, रामदास ढालवाले, महेश संदानशिव, निलेश चव्हाण, सुनील दाभाडे, पुनमचंद चव्हाण, दीपक चव्हाण, बिरजू चव्हाण, कु. निशा दाभाडे, दीपक माधवराव, दिलीप पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करण्याची आणि समाजातील घटकांना न्याय व समानता मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी क्रांती दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
खान्देश समाचार…
