अमळनेर: आगामी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक 2 (अनुसूचित जाती राखीव, पुरुष) येथे एक महत्त्वपूर्ण राजकीय समीकरण उदयास आले आहे. येथील स्थानिक उमेदवार आप्पासो अरुण ओंकार संदानशिव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना सर्व समाजातील घटकांकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून प्रचंड व अभूतपूर्व पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक उमेदवार, समस्यांची जाण:
आप्पासो संदानशिव यांच्या उमेदवारीला मिळत असलेल्या या मोठ्या पाठिंब्यामागे त्यांची स्थानिक ओळख हे मुख्य कारण आहे. अमळनेर प्रभागातील प्रत्येक समस्यांची त्यांना केवळ माहितीच नाही, तर त्यांनी स्वतः त्या समस्यांचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि स्थानिक गावकऱ्यांच्या विचारविनिमयातूनच त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. “प्रभागाच्या समस्यांची जाण असलेला, ‘मातीचा माणूस’च विकास करू शकतो,” अशी भावना मतदारांमध्ये प्रबळ झाली आहे.
जनसंपर्काची मोठी ताकद:
संदानशिव परिवार हा संपूर्ण परिसरात त्यांच्या मोठ्या जनसंपर्कासाठी आणि सुसंस्कृतपणासाठी ओळखला जातो. आप्पासो संदानशिव यांचा मित्रवर्ग मोठा आहे, तसेच संदानशिव परिवाराचे परिसरातील प्रत्येक घरात सलोख्याचे व घरगुती संबंध आहेत. ते प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होणारे आणि अडीअडचणीत धावून जाणारे म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे.
या निवडणुकीत खऱ्या अर्थाने स्थानिक उमेदवाराला अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. आप्पासो संदानशिव यांना मिळत असलेला हा पाठिंबा पाहता, प्रभाग 2 मध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विकासाचा अजेंडा, प्रभावी जनसंपर्क आणि सर्व समाजाचे एकमुखी समर्थन यामुळे या निवडणुकीत संदानशिव हे एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत.
खान्देश समाचार..
