अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (अ) अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी ‘शहर विकास आघाडी’च्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाबाई कढरे यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
सौ. शोभाबाई कढरे यांची उमेदवारी म्हणजे सर्वसामान्य घरातील कर्तृत्ववान महिलेचे प्रतिनिधित्व आहे. त्यांची ही उमेदवारी केवळ निवडणूक नसून, सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. या ‘मातीतील’ उमेदवारीमुळे मतदारांमध्ये एक वेगळी आपुलकीची भावना दिसून येत आहे.
माजी नगरसेविका म्हणून काम करताना सौ. कढरे यांनी प्रभाग ३ मध्ये नागरी सुविधांची मोठी मालिकाच पूर्ण केली आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची दखल नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. “नुसते आश्वासन नाही, तर केलेले काम बोलतेय,” अशी भावना मतदारांमध्ये आहे. त्यांचा जनसेवेचा अनुभव आणि कामाचा ठसा हाच त्यांच्या विजयाचा भक्कम आधार आहे.
संपूर्ण कढरे परिवार नेहमीच प्रभागातील जनतेच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा राहिला आहे. मतदारांशी असलेले त्यांचे कौटुंबिक आणि भावनिक ‘जन-नात’ हे त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ देत आहे. यामुळे ‘शहर विकास आघाडी’च्या उमेदवारास लोकांकडून केवळ मत नाही, तर भावनिक समर्थन देखील मिळत आहे.
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे सौ. कढरे यांच्या प्रचारार्थ एक नवी शक्ती मिळाली आहे. आमदार साहेबांनी त्यांच्या कामावर विश्वास व्यक्त केल्याने, त्यांना मतदारांकडून एक महिला उमेदवार म्हणून, स्वतःच्या कामाच्या जोरावर प्रचंड मतांनी विजय मिळेल, अशी संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा आहे.
खान्देश समाचार…
