अमळनेर: आगामी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ ताडेपुरा, शनि पेठ, वर्णेश्वर नगर, सिंधी कॉलनी मध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड झाली आहे. उच्चशिक्षित आणि खंबीर नेतृत्वाच्या धैर्यावर विश्वास ठेवत, अपक्ष उमेदवार सौ. बबीताताई महेंद्र ताजणे यांच्यासाठी ताडेपुरा येथील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
विकासाच्या मुद्द्यावर घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मधून सौ. बबीताताई ताजणे यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.
‘राज’ संदानशिव यांची माघार: बबीताताईंना जाहीर पाठिंबा!
या संपूर्ण घडामोडीतील सर्वात मोठा निर्णायक टप्पा म्हणजे सामाजिक कार्यकर्ते राज संदानशिव यांनी घेतलेली माघार. ताडेपुरा परिसराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राज संदानशिव यांनी अचानक आपला अर्ज मागे घेत, सौ. बबीताताई ताजणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना राज संदानशिव म्हणाले:
“मी ताडेपुरा विकासासाठी अपक्ष उमेदवारी केली होती. परंतु, माझ्या घरातील ताई म्हणजेच माझी आत्या सौ. बबीताताई ताजणे यासुद्धा उमेदवारी करत आहेत. त्यांचा अनुभव मोठा असून आणि त्या सर्व बाजूंनी भक्कम आहेत. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ चा विकास त्या करू शकतात, या विश्वासावर मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. आपण सर्व नागरिकांच्या हिम्मतीवर ताईंना आपण निवडून आणूच!”
प्रभाग ३ ‘ब’ ची लढाई निर्णायक टप्प्यावर!
एका अत्यंत हुशार, उच्चशिक्षित आणि खंबीर महिला उमेदवार परिसराचा विकास करू शकते, या विश्वासावर सामान्य जनतेनेही शिक्कामोर्तब केल्याचे चित्र आहे. राज संदानशिव यांच्या पाठिंब्यामुळे बबीताताईंच्या बाजूने एक मोठी जनभावना निर्माण झाली आहे.
खान्देश समाचार…
